-
भीमाशंकर करंडक स्पर्धेच्या नियम व अटी :
1. भीमाशंकर करंडक ही स्पर्धा ग्रामीण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड व शिरूर या तालुक्यातील महाविद्यालया पुरती मर्यादित आहे.
2. या स्पर्धेच्या प्रवेशिका www.yuvaa.net या वेबसाईटवर उपलब्ध असून त्या व्यवस्थित भरून त्याच ठिकाणी सबमिट करू शकता किंवा प्रवेशिका ंची प्रिंटआउट काढून त्या भरून त्यावर महाविद्यालयांच्या सही शिक्यानिशी info@yuvaa.net या ईमेल आयडीवर पाठवू शकता प्रवेशिका आमच्या वेबसाईटवर सबमिट करण्याची किंवा ईमेल आयडी वर पाठवण्याची अंतिम तारीख - ५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वा.
3. प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्याने आपले चालू वर्षाचे महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे त्याशिवाय स्पर्धेत सहभाग दिला जाणार नाही.
4. प्रत्येक स्पर्धेचा कार्यक्रम हा दिलेल्या नुसार व वेळेतच होईल त्यामुळे स्पर्धकाने वेळेपूर्वी एक तास आधी रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे उशीर झाल्यास स्पर्धकाचा प्रवेश बाद करण्यात येईल
1.एकांकिका / नाट्य स्पर्धा (स्वलिखित)
-
एका महाविद्यालयातील एकच एकांकिका / नाट्याला प्रवेश दिला जाईल.
-
एकांकिकेसाठी ३० मिनिटांचा वेळ असेल प्रत्येक स्पर्धकाने आपले चालू वर्षाचे महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
-
एकांकिके वेळी वाजवण्याचे संगीत, पेन ड्राईव्ह मध्ये फॉर्म जमा करते वेळीच जमा करावे, ऐनवेळी घेतले जाणार नाही किंवा बदल केला जाणार नाही.
-
एकांकिका मराठी भाषेत असावी एकांकिकेत कोणतेही आक्षेपार्ह, अश्लील शब्द, अपशब्द, असू नयेत. एकांकिकेद्वारा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
-
रंगमंचावर कुठलेही फुले, रंग, भंडारा इत्यादी उधळू नयेत. एकांकिकेसाठी लागणारे साहित्य आपण स्वतः आणायचे आहे.
-
एकांकिकेची स्क्रिप्ट आधी जमा करून तपासून घेणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी रिपोर्टिंग ची वेळ सकाळी ९ वाजता राहील.
2.वक्तृत्व स्पर्धा :
विषयः
* विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर
* भारताची झेप आर्थिक महासत्ता बनण्याकडे
* अपारंपारीक उर्जा स्त्रोत.. काळाची गरज
* सोशल मिडीया - वैचारीक स्वातंत्र्य कि स्वैर विचार
नियम:
-
एका महाविद्यालयातील २ स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.
-
वकृत्व स्पर्धेसाठी वेळ ७ मिनिटे राहील.
-
प्रत्येक स्पर्धकाने आपले चालू वर्षाचे महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
-
स्पर्धेसाठी रिपोर्टिंग ची वेळ सकाळी ९ वाजता राहील.
3.एकपात्री अभिनय स्पर्धा :
-
एका महाविद्यालयातील २ स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.
-
अॅक्टसाठी ५ मिनिटांचा वेळ असेल.
-
फॉर्म सोबत आपली स्क्रिप्ट देणे आवश्यक आहे.
-
प्रत्येक स्पर्धकाने आपले चालू वर्षाचे महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
-
www.yuvaa.net या वेबसाईटवर अपलोड करावा किंवा info@yuvaa.net या इमेलवर १ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अपलोड करावे.
-
स्पर्धेसाठी रिपोर्टिंग ची वेळ सकाळी ९ वाजता राहील.
4.समुह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत-गायन स्पर्धा - पात्रता फेरी
-
एका महाविद्यालयाचे २ संघ/स्पर्धक.
-
प्रत्येक नृत्य/गितासाठी ३ ते ४ मिनीटे आवश्यकतेनुसार स्पर्धकाने आपल्या ऑडिओ ट्रॅक/करा ओके गाणे आपल्या प्रवेशिकेसोबत Mp3 फॉरमॅट मध्ये www.yuvaa.net या वेबसाईटवर अपलोड करावा किंवा info@yuvaa.net या इमेलवर १ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अपलोड करावे.
-
समुह नृत्यासाठी कमीत-कमी एका संघात ४ स्पर्धेक आवश्यक
-
स्पर्धेसाठी रिपोर्टिंग ची वेळ सकाळी ९ वाजता राहील.
प्रत्येक स्पर्धेत पहिले ५ क्रमांक काढले जातील व त्यांचे गुणांकन हे भीमाशंकर करंडक स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील.
तसेच विजेत्यांना आकर्षक वैयक्तिक बक्षिसे-सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक दिले जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रशस्तीपत्रक दिले जाईल.
भीमाशंकर करंडक युवक महोत्सव