आमच्याबद्दल माहिती

भीमाशंकर करंडक युवक महोत्सव

    • भीमाशंकर करंडक - पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा अंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव

    " भीमाशंकर करंडक - युवक महोत्सव "

    पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा युवकप्रिय युवक महोत्सव ...
    सळसळत्या तरुणाईचा जोश जल्लोष आणि उत्साह !!!

    डी जी फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स लि. व भीमाशंकर सह. सर्व. का. लि. आयोजित भीमाशंकर करंडक हा आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव मंचर (पुणे) येथे दर वर्षी आयोजित केला जात असून भीमाशंकर करंडक नावाने ओळखला जातो.
    महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. दिलीपराव वळसे पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका मा. पूर्वाताई वळसे पाटील  यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक तारे- तारका आणि प्रमुख मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत ६ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकच रंगत चढते.

    स्पर्धांचे स्वरूप

    भीमाशंकर करंडक या अंतरंसांस्कृतिक युवक महोत्सव स्पर्धेत पुढील स्पर्धानचा समावेश होतो.

    • वक्तृत्व स्पर्धा
    • एकपात्री अभिनय स्पर्धा
    • स्वलिखित काव्य वाचन स्पर्धा
    • वैयक्तिक नृत्य स्पर्धा
    • समूह नृत्य स्पर्धा
    • गीत गायन स्पर्धा
     
    भीमाशंकर करंडक स्पर्धेची विभागणी तीन सत्रांमध्ये होते. 

    १. पहिले सत्र - सकाळ सत्र...

    • वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता.
    • एकपात्री अभिनय स्पर्धा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता.
    • काव्यवाचन स्पर्धा तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता.

    २. दुसरे सत्र - प्राथमिक फेरी...

    • वैयक्तिक नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा - स्पर्धेच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी सायंकाळी पाच वा. पासून पुढे.

    ३. तिसरे सत्र : महाअंतिम फेरी...

    • महाअंतिम फेरी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ठीक पाच वाजता सुरू होते. महाअंतिम फेरीच्या आधी एक दिवस कोणतीही स्पर्धा होत नाही, महाअंतिम फेरीच्या तयारीसाठी कालावधी रिकामा असतो. महाअंतिम फेरी संपल्यानंतर त्वरितच साधारण अर्धा तासात विजेत्यांची घोषणा करून बक्षीस वितरणाला सुरुवात होते. महाअंतिम फेरीत एकपात्री अभिनय स्पर्धा, गीतगायन, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य स्पर्धा होतील. 

    स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व स्पर्धांसाठी आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून  प्रवेशिका www.yuvaa.net या वेबसाईटवर अपलोड कराव्यात 

    किंवा
    प्रवेशिका आपापल्या महाविद्यालयात दिलेल्या असून प्रवेशिका भरून नेमून दिलेल्या कालावधीतच नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जमा कराव्यात.

    किंवा

    प्रवेशिका स्कॅन करून महाविद्यालयाच्या सही शिक्का घेऊन info@yuvaa.net या मे आयडी वर पाठवावेत 

    • स्पर्धेचे मागील विजेते -

    या स्पर्धेच्या पहिल्या वर्षी म्हणजेच

    2013 चे विजेते
    शासकीय अभि. कॉलेज, अवसरी, ता. आंबेगाव

    2014 चे विजेते
    पी. के. टेक्नीकल कॉलेज, चाकण, ता. खेड

    2015 चे विजेते
    अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव

    2016 चे विजेते
    जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुरण, ता. जुन्नर

    2018 चे विजेते
    शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी खुर्द ता. आंबेगाव

    2019 चे विजेते
    विशाल जुन्नर कॉलेज ऑफ फार्मसी, आळे, ता. जुन्नर

    2020 चे विजेते
    अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर तालुका आंबेगाव.

    या महाविद्यालयांनी विजेतेपदाचा बहुमान पटकावलेला आहे.

    स्पर्धेत सहभाग घेण्याचे निकष :

    • अकरावी व त्यापुढील शिक्षण घेणारे महाविद्यालयीन युवक युवती या महोत्सवात आपल्या महाविद्यालयाच्या मार्फ़त सहभाग घेऊ शकतात.
    • स्पर्धेत प्रत्येक विभागात वैयक्तिक आकर्षक बक्षीसे, चषक व प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र असतेच् परंतु जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये बक्षीसे पटकाविणाऱ्या महाविद्यालयास जनरल चैंपियनशिप, प्रतिष्ठेचा भीमाशंकर करंडक- रोख रक्कम रु ५१,०००/- व प्रमाणपत्र असे मुख्य बक्षिसाचे स्वरुप आहे.
    • या महोत्सवाचे हे बारावे वर्ष असून स्पर्धक आणि प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय.
    • या वर्षी दर वर्षिपेक्षा काहीतरी नविन आणि दर्जेदार देण्यासाठी संयोजक सज्ज आहेत .
    • आपणही आपल्या संकल्पना आणि सुचना या आमच्या पर्यंत पोहचवल्यास आम्हाला आनंदच होईल...
    • संपर्क ९९२१८८१०००

    आपले नम्र.

    भीमाशंकर करंडक युवक महोत्सव.व भीमाशंकर करंडक संयोजन समिती


भीमाशंकर करंडक युवक महोत्सव